पोलीस प्रवाह न्युज - कोल्हापुर प्रतिनिधी
प्रवाशांमध्ये समाधान तर राष्ट्रवादी काँग्रेस एकोंडी कडुन चालक-वाहक यांचा सत्कार
कोरोणा महामारी आणि नंतर एस.टी चा संप असे दिड वर्ष एस.टी बंद त्यामुळे प्रवाशांचे मोठे नुकसान होत होते.शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत होता.
अश्या परिस्थितीमध्ये एकोंडी गावामध्ये आजपासुन पहिल्यांदाच शाहु मैदान ते एकोंडी एस.टी महामंडळाची बस सेवा एकोंडी ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून स्वागत करून हार आणि फेटा देऊन सत्कार करण्यात आला.तर ग्रामस्थांना ह्याचा लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले.
ह्याप्रसंगी एकोंडी गावचे माजी संरपच शामराव सुदर्शनी,सामाजिक कार्यकर्ते सुरेश बोभाटे,मारुती मगदुम,विद्यमान ग्रामपंचायत सदस्या कु नम्रता बोभाटे,संतोष लोंढे,रमेश सातुसे,शंकर बल्लाळ,सौरभ बोभाटे गौरव बोभाटे,सुनिल बल्लाळ,उमेश पाटील,सचिन पाटील इ.ग्रामस्थ उपस्थित होते.


0 टिप्पण्या