मुरगूडच्या श्री. गणेश नागरी सहकारी पत संस्थेला सन २०२९-२०२२ या आर्थिक वर्षात

२ कोटी ३९ हजार इतका विक्रमी नफा.ठेवीमध्ये विक्रमी वाढ- एकूण ठेवी ७८ कोटीचे वर कर्जामध्ये ही विक्रमी वाढ एकूण कर्जे ६२ कोटीचे वर


कागल प्रतिनिधी-ओंकार पोतदार


मुरगूड ता. कागल येथील श्री. गणेश नागरी सहकारी पत संस्थेला चालू आर्थिक वर्षामध्ये २ कोटी ३९ हजार इतका प्रचंड नफा झालेला आहे.

सन १९८८-१९८९ मध्ये के. खासदार श्री. सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या आर्शिवादाने स्थापन झालेल्या या पत संस्थेने अल्पावधीतच मोठी गरुड भरारी घेतलेली आहे. ही संस्था अल्पावधीतच सर्वाच्या विश्वासास पात्र ठरलेली आहे.

संस्थेचे चेअरमन श्री. उदयकुमार शहा यांनी संस्थेच्या सन २०२१-२०२२ या सालातील सांप्पत्तीक स्थितीचा आढावा घेत असता संस्थेच्या सेवकांनी केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. आगामी वर्षात संस्थेच्या ठेवी १०० कोटी वर असतील अशी ग्वाही संस्थेचे चेअरमन श्री. उदयकुमार शहा व कार्यकारी संचालक श्री. राहुल शिंदे यांनी दिली त्यासाठी संस्थेच्या सभासदानी ठेवीदार व हितचिंतकांनी ठेवी ठेवून सहकार्य करावे असे आवाहन केले तसेच संस्थेच्या सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांचे आभार मानले संस्थेच्या पुढील प्रमाणे सांप्पत्तीक स्थितीचा आढावा दिला.

दिनांक ३१/०३/२०२२ अखेर संस्थेची सांप्पत्तीक स्थिती खालील प्रमाणे आहे.

संस्थेच्या एकूण ठेवी ७८ कोटी ०६ लाख इतक्या आहेत.

एकूण कर्जे ६२ कोटी ४८ लाख इतकी आहेत त्यामध्ये सोने तारण कर्ज हे २३ कोटी २६ लाख आहे.

संस्थेचे वसुल भागभांडवल ३७ लाख ८९ हजार आहे.

संस्थेतील राखीव निधी ५ कोटी ७० लाख इतका आहे.

संस्थेची इतर बँकामध्ये एकूण गुंतवणूक रुपये २५ कोटी २८ लाख इतकी आहे.

संस्थेचे खेळते भांडवल ९४ कोटी ०८ लाख इतका आहे.

चालू आर्थिक वर्षात संस्थेला २ कोटी ३९ हजार इतका प्रचंड नफा झालेला आहे.

संस्थेची एकूण वार्षीक उलाढाल ५५३ कोटी ०५ लाख इतकी आहे.संस्थेचे एन पी ए ०% असून थकबाकी फक्त ००.२५% आहे.

संस्थेला सतत ऑडीट वर्ग 'अ 'आहे.संस्थेच्या मुख्य कार्यालय तसेच केनवडे, बिद्री व गारगोटी या ठिकाणी संस्थेच्या इतर शाखा आहेत.संस्थेची स्वमालकीची सुसज्ज इमारत असून संस्थेचा संपुर्ण कारभार हा संगणकीकृत आहे क्रियाशील संचालक मंडळ व विनम्र सेवक वर्गामूळे संस्थेची वाढ झपाट्याने होत आहे. व्यवहारात खुप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे संस्थेकडे लॉकर्सची सुविधा उपलब्ध आहे विनम्र व तत्पर सेवेमूळे संस्थेचा खुप मोठ्या प्रमाणात नाव लौकीक होत आहे.संस्थेने चालू आर्थिक वर्षात मुदतबंद ठेवीवर १३ महीने करीता ९.५ % इतका भरघोस व्याजदर संस्था ठेवीदारांना दिलेला आहे सभासदांना १५ % डिव्हीडंड देवून दिपावली निमित्य ५ लिटर खाद्यतेल देनेत आले आहे.एकंदरीत व्यवहार पाहता ही संस्था सगळ्याच बाबतीत अग्रेसर आहे सर्व लोकांना चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करुन देणारी संस्था म्हणून श्री गणेश नागरी सहकारी पत संस्था असे संबोधले जाते. संस्थेची संपत्तीक स्थितीचा आढावा देताना .चेअरमन श्री. उदयकुमार शहा व व्हाईस चेअरमन श्री. प्रकाश हावळ श्री. एकनाथ पोतदार श्री. आनंदराव देवळे, श्री. मारुती पाटील, श्री.सुखदेव येरुडकर, श्री. सोमनाथ यरनाळकर, श्री. राजाराम कुडवे श्री. आनंदा जालीमसर, श्री. दत्तू कांबळे, सौ. रुपाली शहा, सौ. रेखा भोसले व संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. राहुल शिंदे व सर्व सेवक वर्ग हजर होता.