अरुण पवार, प्रतिनिधी

   माणगाव : दि २७- माणगाव तालुक्यातील डोंगरोली खालची वाडी गावांत छोट्याशा कारणावरून दोन गटांत संचारबंदी काळात जबरदस्त राडा झाला. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात येवून दोन्ही गटातील एकूण २३ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत  दोन्ही गटातील मिळून एकूण ८ जण जखमी झाले आहेत.ही घटना २५ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास घडली.यानंतर पुन्हा दुपारी १ वा. दोन्ही गटांत हाणामारी होऊन रात्री ९:३० वा. ही घटना माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,एका गटाकडून बाळकृष्ण श्रीपद म्हसकर (वय ५९) रा. डोंगरोली खालची वाडी ता.माणगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तक्रारदार बाळकृष्ण म्हसकर यांनी त्यांची बैलगाडी त्यांच्या वाड्याच्या कडेला रोडवर लावली या कारणावरून आरोपी  चंद्रकांत डोंगरे, कल्पेश महादेव डोंगरे, अनिकेत अनिल डोंगरे, हेमंत महादेव डोंगरे, संजय भिकु डोंगरे, योगेश महादेव डोंगरे, बनीज नथुराम डोंगरे, भागेश ज्ञानेश्वर ढवुल, संतोष दगडू डोंगरे, नितीन किसन पाखड,ललिता अनिल डोंगरे ,भावना भरत डोंगरे, शिल्पा नितीन पाखड,बाबुराव भिकू डोंगरे सर्व राहणार डोंगरोली खालची वाडी ता.माणगाव यांनी एकत्रित येवून गैरकायद्याची मंडळी  जमवून  शासनाचे संचार बंदीचे आदेश झुगारून जखमी  तक्रारदार बाळकृष्ण श्रीपद म्हसकर ,मुलगा किसन बाळकृष्ण म्हसकर,संतोष महिपर फणसे,सुगंधा सुनील फणसे सर्व रा. डोंगरोली खालची वाडी यांना हातबुक्यांनी मारहाण करून पोलीस स्टेशनला गेलात तर कापून  टाकू अशी धमकी दिली.

दुसऱ्या  गटाकडून संतोष दगडू डोंगरे(वय ३४) रा. डोंगरोली खालची वाडी तालुका माणगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार घटनेतील  आरोपी बाळकृष्ण श्रीपद म्हसकर यांनी त्यांची बैलगाडी त्यांच्या वाड्याचा कडेला रोडवर लावली असताना तक्रारदार संतोष डोंगरे यांच्या टेंपोला जाण्यासाठी जागा न मिळाल्याने या कारणावरून आरोपी बाळकृष्ण श्रीपद म्हसकर(वय ५९), पप्पू गणपत बामणे ( वय  ४५), गणेश काशिराम फणसे(वय ४६), सुनील काशिराम फणसे(वय ३८), अनिल काशिराम फणसे(वय३०), महीपर फणसे(वय३४),संदीप महिपर फणसे (वय ३२), रोहिदास महीपर फणसे(वय २५), किसन बाळकृष्ण म्हसकर सर्व रा.डोंगरोली खालची वाडी ता.माणगाव  यांनी एकत्रित येवून गैरकायद्याची मंडळी जमवून शासनाचे संचार बंदीचे आदेश झुगारून जखमी तक्रारदार संतोष डोंगरे,वैशाली बाबुराव डोंगरे(वय ५०) बाबुराव भिकू  डोंगरे(वय ५५) भावना भरत डोंगरे(वय३५) सर्व राहणार डोंगरोली खालची वाडी यांना हाता बुक्याने मारहाण केली.

याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.र.नं.७०/२०२० मधील आरोपींवर भादवि कलम १४३,१४७,३२३,५०६,१८८,२६९,२७० म.पो. अ.कलम ३७(१)(३), १३५ अा. व्य. अ कलम ५१ (ब) म. कोविड १९ वि कलम ११ सा.रो. अ. कलम २,३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर कॉ.गु.र.नं.७१/२०२० मधील आरोपींवर भादवि कलम १४३,१४७,३२३,१८८,२६९,२७० म.पो. अ.कलम ३७(१)(३), १३५ अा. व्य. अ कलम ५१ (ब) म. कोविड १९ वि कलम ११ सा.रो. अ. कलम २,३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदर घटनेचा अधिक तपास माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशीद यांच्या मार्गदर्शनानुसार व पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक फौजदार जितेंद्र वाटवे हे करीत आहेत.

                             पोलीस प्रवाह न्यूज
#covid19 #coronavirus #lockdown #raigad #Mangaon#Maharashtranews